Thursday, 23 May 2019

Rampaat Rap Song

Movie: Rampaat

Singer: Chinar & Mahesh


Music: Chinar & Mahesh


Lyricist: Jazzy Nanu, A-Jeet, J-Subodh, Axsboy & Ravi Jadhav


Rappers: A-Jeet, J-Subodh, Jazzy Nanu, Axsboy, Killer Roxx: Beatboxer


Cast: Abhinay Berde, Kashmira Pardeshi, Anand Ingale, Vaibhav Mangle

Rampaat Rap Song Video




Rampaat Rap Song Lyrics 

आपल्याला भिडला कान गच्च करून सोडला
हक्काचा घास आम्ही स्वतःच मिळवला
फुकटचा वाजवू नका देऊ तुमचा सल्ला
रंपाट आमची गती वर नेऊ मायबोलीला
सोळा वर्षात लागला ह्यो नाद
थांबलो नाय कधी नाय झालोय कधी बाद
मेहनत करत राहिलो आलो चित्रपटात ,
जे बोलत होते मागून त्यांची लावणार आता वाट
मित्र जातोरे खूप वेगाने पुढे
फडकवणार झेंडे मातृभाषेचे
नादखुळा सिनेमाचा डोक्यामध्ये , जीवनामध्ये
बघतो किती येतात किती , पैसे टाकून जातात भाऊ ,
पुढे जाऊ , नाहीतर भाऊ , काशी मध्ये जाऊ ,
माज मराठी , मोडेन पण नाय वाकणार भाव ,
बसले शांत ऐकून अ ब ग ग ग....

शब्दात ताकद आमच्या अ ब ब ब ब ब...
रंपाट लय रंपाट....
बिंधास मराठी पोरं ही रंपाट....
रंपाट लय रंपाट
घेऊ मुठीत सारी दुनिया रंपाट..
ये भावड्या ऐक ना बे
मराठी रॅप हा बे
हा घालणार राडा उडेल तुझा थरकाप ना बे...
संताप हा रे,
होईल तुझाच ना रे,

जेव्हा मी देईन तुला शब्दांचा हा शॉट ना रे
किती आले,
किती गेले कोणाच्या आलो नाय हाता
घाम सांडून,कला मांडून,
आलो स्वतःशी मी भांडून
केली मेहनत, बनलो मेहनती,

केली उन्नती, केली प्रगती,

अशी घेतली गती मनाची,

वाढवली श्रीमंती!
जगात भारी आम्ही पोरं मराठमोळी

जर का ठरवलं काही करू मुलं नादखुळी

डोक्याला शॉट नाय बाकी हे निवांत हाय

नडला जर का आम्हा तर भावा व्हणार दंगल नाय

आलो म्होरं आम्ही पोरं अंगी बळ आहे जोर

बनू थोर बोली गोड मेहनतीची त्याला जोड

स्वप्नंं केली पूर्ण काढल्यात जागून राती

आता जगणं माझं फक्त मराठीत गाजण्यासाठी
रंपाट लय रंपाट

बिंधास मराठी पोरं ही रंपाट
रंपाट लय रंपाट

घेऊ मुठीत सारी दुनिया रंपाट..
जपली मराठी संस्कृती,जोडली नाती,

माती ख्याती विसरून जाती पाती महाराष्ट्राची ही कीर्ती सांगू किती,

येईल भरती,

प्रेम करतो भाषेवर्ती जपतो माणुसकी मराठी सांगतो नवशाहीर

अभिमानाने,

ज्ञानाने लहान मोठ्या थोराने ऐक तुझ्या कानाने रंपाट या पोराने केला धुरळा,

आत शिरला,पुरून उरला मर्द गडी,

भाषेत गोडी घेतली रंपाट उडी बघ कशी भुरर...
तांबडा पांढरा व्हढला हाय

रांगडा मी भिडलो हाय

घाटी मी मराठी म्हणून लेका मी तर रंपाट हाय

कालचा मी आज नाय

स्वप्नं जगतोय सत्त्यात काय

मागून बोलणारे हे आज बोलतायत

अगं आय आय…
प्रवाहाच्या विरोधात भावा पव्हलोय मी

आणली ती स्थिती आधी माझी कधी नव्हती

येऊदेत कितीपण अडचणी माझ्या म्होरं हसून मी बोलेन त्यांना काय चालतंय की
रंपाट लय रंपाट

बिंधास मराठी पोरं ही रंपाट…
रंपाट लय रंपाट

घेऊ मुठीत सारी दुनिया रंपाट…





No comments:

Post a Comment

तु असतीस तर

तु असतीस तर झाले असते सखे उन्हाचे गोड चांदणे मोहरले असते मौनातुन एक दिवाने नवथर गाणे बकुळुच्या फुलापरी नाजुक फुलले असते गंधाने...

Popular Posts