असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची
आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची
असे दांडगी ईछा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना
हसू असावे ओठांवरती काळीज काढुन देताना
संकटासही ठणकावुन सांगावे आता ये बेहत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
करुन जावे असेही काही दुनियेतुनी या जाताना
गहिवर यावा जगास सा-या निरोप शेवट देताना
स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
- गुरु ठाकूर
तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे
हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी साधना करिती तुझी जे नित्य तव सहवास दे
जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना धमण्यातल्या रुधिरास या खल भेदण्याची आस दे सामर्थ्य या शब्दांस आणि अर्थ या जगण्यास दे
सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती नीती ना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती पंखास या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे
मी गेल्यावर
तुला वाटेल की आपल्या बाबांनी
वाचलियेत ही सारी पुस्तंकं
पण नाही
अर्धंही वाचता आलेलं नाहीय्
येणारही नाही हे ठाउक होतं मला तरी
मी ज़मवत गेलो होतो ही पुस्तंकं
माझ्यासाठी माझ्या बापाने
काहीच सोडलं नव्हतं मागे
ही अक्षर ओळख सोडून फक्तं
जिच्या मागे धावत मी
पोहोचलो आहे इथवर
तुला सांगण्या समज़ावण्यासाठी की
मलाही सोडता येणार नाहीय् मागे
काहीच स्थावर जंगम तुझ्यासाठी
ही काही पुस्तंकं आहेत फक्तं
जी तुला दाखवतिल वाट
चालवतिल तुला थांबवतिल
कधी पळवतिल कधी
निस्तब्धं करतिल
बोल्तं करतिल कधी
टाकतिल संभ्रमात
सोडवतिल गुंते
वाढवतिल पायाखालचा चिखल
कधी बुडवतिल तरवतिल कधी
वाहावतील कधी थोपवतील प्रवाह
अडवतिल तुडवतिल सडवतील
बडवतील हरवतिल सापडतिल
तुझ्याशी काहीही करतील
ही पुस्तंकं
तू समोर आल्यावर नेहेमीच कवेत घेउन मी माझ्यातली धडधड
तुला देण्याचा प्रयत्नं करतो
तशीच ही पुस्तंकं
उघडतील मधोमध पसरतिल हात
मिठीत घेतील तुला
आपोआप होतिल हृदयाचे ठोके
यांच्यात रहस्य् आहेत दडलेली
अनेक उत्तरंही असतील
प्रश्नांमधे कदाचित कुठेच
प्रश्नही नसतील
एक लक्षात ठेव
आपलं आयुष्यच पल्प फिक्शन कधी क्लासिक
सेल्फ हेल्प फिलॉसॉफिकल कधी कवितिक
कधी किचकट कधी सोपं असतं
लक्षात असु दे या सगळ्यात
वाईट काहिच नसतं
त्या वेळी हाती लागलेलं पुस्तक
त्याच वेळची गरज़ असतं समज़ नसतं
मी नसेन तेंव्हा ही पुस्तकं असतील
जी नेतील तुला ज़ायचं आहे तिथं
फक्तं
मी असेन
तिथं मात्रं तुला पोहोचता येणार नाही
कारण मी आधीच
होउन गेलेलो असेन तुझ्यासाठी
एखादी कथा एखादी कादंबरी
एखादी कविता एखाद्या पुस्तंकातली
माझी आठवण आली की
या प्रचंड ढिगार्यातलं
ते एखादं पु्स्तक शोध
तुझा प्रवास बघ कसा
सोपा होउन ज़ाईल.
हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन आणि कळतच नाही बोलतय कोण बोलतच नाही मुळी पलीकडे कोणी ऐकू येत रहातं फक्त डोळ्यातलं पाणी …(१) कळताच मलाही मग थोडंसं काही मीही पुढे मग बोलतंच नाही फोनच्या तारेतून शांतता वाहते खूप खूप आतून अजून काही सांगते …(२) नदी नि शेतं नि वार्याची गिरकी ढगाची विजेने घेतलेली फिरकी वाळूवर काढलेली पाण्याची चित्रं “तुझा” पुढे मी खोडलेला “मित्र” …(३) टपला नि खोड्या नि रुसवे नि राग एकदा तरी सहज म्हणून शहाण्यासारखं वाग हसायचे ढीगभर नि लोळून लोळून बोलायचे थोडेच पण घोळून घोळून…(४) वडाचे झाड आणि बसायला पार थंडीमधे काढायची उन्हात धार कॉफी घेउन थोडेसे बोलायचे कडू हसताना पहायचे येते का रडू …(५) बोलायचे गाणे आणि बोलायची चित्रं नुसतीच सही करुन धाडायची पत्रं क्षणांना यायची घुंगरांची लय प्राणांना यायची कवीतेची सय…(६) माणूस आहेस “गलत” पण लिहितोस “सही” पावसात भिजलेली कवीतांची वही पुन्हा नीट नव्याने लिहीत का नाहीस? काय रे…. काही आठवतय का नाही? शब्दसुद्धा नाही तरी कळे असे काही हातामधला हात सुद्धा जितकं बोलत नाही…(७) हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन आणि कळतच नाही बोलतय कोण दोन्ही कडे अबोला आणि मध्यात कल्लोळ छाती मधे घुसमटतात हंबरड्यांची लोळ…(८) ऐकू येतात कोंडलेले काही श्वास फक्त कोणासाठीतरी खोल दुखलेलं रक्त गरम होतात डोळे नि थरथरतो हात सर्रकन निघते क्षणांची कात…(९) उलटे नि सुलटे कोसळते काही मुक्यानेच म्हणतो “नको… आता नाही” फार नाही… चालतो मिनिटे अवघी तीन तेवढ्यात जाणवतो जन्माचा शीण तुटत गेले दोर आणि उसवत गेली वीण डोळे झाले जुने तरी पाणी नविन…(१०) हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन…. – संदिप खरे
हैय्या हो. . . .
रुपेरी वालू , सोनेरी लाटा
त्याव माझ व्हरक तरतय
कोने देशी नेऊ , कोने गावी नेऊ
सांग तुझे मनान काय घरतय. . .
गोव्याचे किना-याव , नाखवा व्हरीन नेशील का ?
निले सागरी दुनियेची सफर देशील का ?
नको बघु अस , मनी होत कस
माझे कालजान भरली रं लाज
तुझे नजरच्या जाल्यामंदी
कालीज गुतल आज
गोव्याचे किना-याव , नाखवा व्हरीन नेशील का ?
गोव्याचे किना-याव , नाखवा बेगीन नेशील ना. .
हय्या हो .. हय्या हो ..
इच्छा तुझे मनी. . येवो माझे ध्यानी
न सांगता समजल का ?
त्या गोव्याचे बाजारानु
हात हाती देशील का?
एैशे गोवे शहरान जरी नेशील संगान
एक हौस माझी पुरवाल का ?
माझे एकवीरा माऊलीच दर्शन घरवाल का ?
रुपेरी वालू , सोनेरी लाटा
त्याव माझ , व्हरक तरतय
कोने देशी नेशील , कोने गावी नेशील
सांग तुझे मनान काय चाल्लय. . .
कोने देशी नेऊ , कोने गावी नेऊ
सांग तुझे मनान काय घरतय. . .
ओठावर खुले लाली गुलाबाची (othavari khule lali gulabachi ) कधी कुठे कसा तुला सांग भेटू ( kadhi kothe kasa tula saang bhetu) वाट पाहतो मी एका इशारयाची (vat pahto mi eka esharyachi) जाऊ नको दूर तू ( jau nako dur tu ) अशी ये समोर तू ( ashi ye samor tu ) माझा रंग तू घे ( maza rang tu ghe ) तुझा रंग मला दे ( tuza rang mala de ) I Love you… I Love you … I Love you कोणता हा मौसम मस्त रंगाचा( konataha mausam mast rangacha… ha ) तुझ्या सवे माझ्या जीवनी आला (tuzya save mazya jivani aala…. ) सुने सुने होते किती मन माझे ( sune sune hote kiti mann majhe…) आज तेच वाटे धुंद मधुशाला (aaj tech wate dhunda madhushala ) जगण्याची मज आता कळते मजा ( jaganyachi maj aata kalate maja ) नाही मी कोणाचा आहे तुझा ( nahi me kunacha aahe tujha ) सांगतो मी खरे खरे ( sangato me khare khare ) तुझ्या साठी जीव झुरे ( tujhya sathi jeev jhure ) मन माझे थरारे ( man majhe tharare ) कधी तुझ्या पुढे पुढे ( kadhi tujhya pudhe pudhe ) कधी तुझ्या मागे मागे ( kadhi tuzya mage mage ) करतो मी इशारे ( karato me ishare ) जाऊ नको दूर तू ( jau nako dur tu ) जाऊ नको दूर तू ( jau nako dur tu ) अशी ये समोर तू ( ashi ye samor tu ) माझा रंग तू घे ( maza rang tu ghe ) तुझा रंग मला दे ( tuza rang mala de ) तुझ्या पापण्यांच्या सावली खाली ( tuzya papnyanchya sawali khali) मला जिंदगी घेउनी आली ( mala jindagi gheuni aali ) तुझ्या चाहुलीची धुंदी आनंदी ( tuzya chahulichi dhundi aanandi) अंतरास माझ्या छेडुनी गेली ( antaras mazya cheduni geli ) जगण्याची मज आता येई नशा ( jagnyachi maj aata yei nasha) तू माझे जीवन तू माझी दिशा ( tu maze jivan tu mazi disha) आता तरी माझ्या वरी ( aata tari mazya wari) कर तुझी जादूगिरी हुरहुर का जिवाला ( kar tuzi jadugari hurhur ka jivala ) बोल आता काही तरी ( bol aata kahi tari ) भेट आता कुठे तरी कसला हा अबोला ( bhet aata kuthe tari kasla ha abola) हे जाऊ नको दूर तू ( he jau nako dur tu) जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू( Jau nako dur tu ashi ye samor tu ) माझा रंग तू घे तुझा रंग मला दे ( maza rang tu ghe , tuza rang mala de )
आली होळीच्या दिसाला दुपाराला ( Aali Holichya Disala Duparala)
कुठं निघाली तु आज बाजाराला …२ (Kuth Nighali Tu Aaj Bajarala…2)
ज़रा पिरमानं वाग (Jar Pirman Vaag)
माझा लयभारी swag (Majha Laybhari Swag)
तुझ्या लवर चा tag मला द्युउन टाक …२ (Tujhya Lover Cha Tag Mala Dhuvun Taak…2)
आता कश्शाचा राग (Aata Kashyacha Rag)
हा तर रंगाचा डाग (Ha Tar Rangacha Dag)
तुझ्या साडीला surf लावुन धुवून टाक (Tujhya Sadila Surf Lavun Dhuvun Taak)
Angry का तु पोरी ( Angry Ka Tu Pori )
चल मी म्हनतो sorry ( Chal Me Mahnto Sorry)
रंग खेळुन टाकुन द्ये तु ( Rang Khelun Takun Dye Tu)
Insta वरती story (Insta Varti Story)
केला पैका spend (Kela Paika Spend )
रंग eco friend (Rang Eco Friend)
गोपगोपिकांनी केला (Gopgopikanni Kela)
ह्योच Hashtag trend (Hyoch Hashtag Trend)
आता रुसायचं न्हाय ( Aata Rusaych Nhay)
कुनी पुसायचा न्हाय (Kuni Pusaycha Nhay)
रंग उरलेला हाय त्यो मला लाऊन टाक …२ (Rang Urlela Hay Tyo Mala Lavun Taak )
आता कश्शाचा राग (Aata Kashyacha Rag )
हा तर रंगाचा डाग (Ha Tar Rangacha Dag)
तुझ्या साडीला surf लाऊन धुवून टाक ( Tujhya Sadila Surf Lavun Dhuvun Taak)
ऊन जरा जास्त आहे , दरवर्षी वाटत ( Un jara jast aahe, darvarshi watat)
भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटत (Bhar oonat paus ghevun aabhal manat datat)
तरी पाऊले चालत राहतात मन चालत नाही (tari paule chalat rahatat man chalat nahi)
घाम शिवाय शरीरामध्ये काहीच बोलत नाही (ghama shivay shariramadhe kunich bolat nahi)
तितक्या त कुठून तरी एक ढग सूर्य समोर येतो (titkyat kuthun ek dhag surya samor yeto ) - 2
उन्हा मधील काही भाग पंखा खाली घेतो (unha madhil kahi bhag pankha khali gheto)
वारा उनाड मुला सारखा वैरा पळत राहतो (vara unad mula sarkha saira vaira palat rahto)
पाना फुला झाडांवरती छपरावरती चढून पाहतो (pana fula zhadanvarti chaparavarti chadhun pahto)
दुपार टळून संध्याकाळचं सुरु होतो पुन्हा खेळ (dupar taloon sandhyakalcha suru hoto punha khel)
उन्हा मागून चालत येते गार गार कातरवेळ (unha magun chalat yete gaar gaar katarvel)
चक्क डोळ्यांसमोर ऋतू कूस बदलून घेतो (chakya dolyan samor rutu kus badloon gheto)
पावसा आधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो (pavsa aadhi dhagan madhe kuthun garwa yeto)
गारवा ~~~ (garva hm hm) - 2
वाऱ्यावर भिरभिर पारवा (varyavar bhirbhir parwa)
नवा नवा (nawa nawa)
प्रिये नभातही चांदवा नवा नवा ( priye nabhatahi chandawa nava nava)
गारवा (garva)
गवतात गाणे झुलते कधीचे -२
(gavatat gaane zulate kadhiche)-2
हिरवे किनारे हिरव्या नदीचे -२
(hirve kinare hirvya nadiche) - 2
पाण्यावर सरसरसर काजवा नवा नवा ( panyavar sarsarsar kajwa nava nava)
प्रिये मनातही काजवा नवा नवा (priye manatahi kajwa nava nava)
गारवा (garva)
आकाश सारे माळून तारे आता रुपेरी झालेत वारे (aakash saare malun taare aata ruperi zalet vare) - 2
अंगभर थरथरथर नाचावा नवा नवा ( angbhar thartharthar nachava nava nava)
प्रिये तुझा जसा गोडवा नवा नवा (priye tuzha jasa godva nava nava)
गारवा (garva)
वाऱ्यावर भिरभिर पारवा (varyavar bhirbhir parwa)
नवा नवा (nawa nawa)
प्रिये नभातही चांदवा नवा नवा (priye nabhatahi chandawa nava nava)
बागेतुनी व बाजारातुनी कुठुनी तरी ‘त्याने’ गुलाबपुष्पे आणून द्यावीत ‘तिज’ला नियमाने कशास सांगू प्रेम तयाचे तिजवरती होते? तुम्हीच उकला बिंग यातले काय असावे ते! गुलाब कसले प्रेम पत्रिका लाल गुलबी त्या लाल अक्षरे जणू लिहलेल्या पाठोपाठ नुसत्या प्रेमदेवता प्रसन्न हो! या नैवद्याने प्रेमाचे हे मार्ग गुलाबी जाणती नवतरणे कधी न त्याचा ती अवमानी फ़ुलता नजरणा परी न सोडला तिने आपुला कधीही मुग्धपणा या मौनातच त्यास वाटले अर्थ असावे खोल तोही कशाला प्रगट करी मग मनातले बोल अखेर थकला ढळली त्याची प्रेमतपश्चर्या रंग दिसे ना खुलावयाचा तिची शांतचर्या ... धडा मनाचा करुन शेवटी म्हणे तिला ‘देवी’ दुजी आणखी विशेषणे तो गोंडस तिज तो लावी “बांधीत आलो पुजा तुज मी आजवरी रोज तरी न उमगशी अजुन कसे तू भक्ताचे काज गेंद गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिलेले सांग सुन्दरी फ़ुकट का सगळे गेले?” तोच ओरडून त्यास म्हणे ती “आळ वृथा हा की एक पाकळी ही न दवडली तुम्ही दिल्यापैकी” हे बोलूनी त्याच पावली आत जाय रमणी क्षणात घेउन ये बाहेरी कसलीशी बरणी म्हणे “पहा मी यात टाकले तुमचे ते गेंद आणि बनवला तुमच्या साठी इतुका गुलकंद का डोळे असे फ़िरवता का आली भोवंड बोट यातले जरा चाखुनी गोड करा तोंड ” क्षणैक दिसले तारांगण त्या परी शांत झाला तसाच बरणी आणि घेवुनी खांद्यावरी आला “प्रेमापायी भरला” बोले “भुर्दन्ड न थोडा प्रेमलाभ नच,गुलकंद तरी कशास हा दवडा?” याच औषधावरी पुढे तो कसातरी जगला ‘हृदय थांबूनी कधीच ना तरी असता तो’ खपला! तोंड आबंले असेल ज्यांचे प्रेम निराशेने प्रेमाचा गुलकन्द त्यांनी चाखूनी हा बघणे..
फुकटचा वाजवू नका देऊ तुमचा सल्ला
रंपाट आमची गती वर नेऊ मायबोलीला
सोळा वर्षात लागला ह्यो नाद
थांबलो नाय कधी नाय झालोय कधी बाद
मेहनत करत राहिलो आलो चित्रपटात ,
जे बोलत होते मागून त्यांची लावणार आता वाट
मित्र जातोरे खूप वेगाने पुढे
फडकवणार झेंडे मातृभाषेचे
नादखुळा सिनेमाचा डोक्यामध्ये , जीवनामध्ये
बघतो किती येतात किती , पैसे टाकून जातात भाऊ ,
पुढे जाऊ , नाहीतर भाऊ , काशी मध्ये जाऊ ,
माज मराठी , मोडेन पण नाय वाकणार भाव ,
बसले शांत ऐकून अ ब ग ग ग....
…
शब्दात ताकद आमच्या अ ब ब ब ब ब...
रंपाट लय रंपाट....
बिंधास मराठी पोरं ही रंपाट....
रंपाट लय रंपाट
घेऊ मुठीत सारी दुनिया रंपाट..
ये भावड्या ऐक ना बे
मराठी रॅप हा बे
हा घालणार राडा उडेल तुझा थरकाप ना बे...
संताप हा रे,
होईल तुझाच ना रे,
जेव्हा मी देईन तुला शब्दांचा हा शॉट ना रे
किती आले,
किती गेले कोणाच्या आलो नाय हाता
घाम सांडून,कला मांडून,
आलो स्वतःशी मी भांडून
केली मेहनत, बनलो मेहनती,
केली उन्नती, केली प्रगती,
अशी घेतली गती मनाची,
वाढवली श्रीमंती!
जगात भारी आम्ही पोरं मराठमोळी
जर का ठरवलं काही करू मुलं नादखुळी
डोक्याला शॉट नाय बाकी हे निवांत हाय
नडला जर का आम्हा तर भावा व्हणार दंगल नाय
आलो म्होरं आम्ही पोरं अंगी बळ आहे जोर
बनू थोर बोली गोड मेहनतीची त्याला जोड
स्वप्नंं केली पूर्ण काढल्यात जागून राती
आता जगणं माझं फक्त मराठीत गाजण्यासाठी
रंपाट लय रंपाट
बिंधास मराठी पोरं ही रंपाट
रंपाट लय रंपाट
घेऊ मुठीत सारी दुनिया रंपाट..
जपली मराठी संस्कृती,जोडली नाती,
माती ख्याती विसरून जाती पाती महाराष्ट्राची ही कीर्ती सांगू किती,
येईल भरती,
प्रेम करतो भाषेवर्ती जपतो माणुसकी मराठी सांगतो नवशाहीर
अभिमानाने,
ज्ञानाने लहान मोठ्या थोराने ऐक तुझ्या कानाने रंपाट या पोराने केला धुरळा,
आत शिरला,पुरून उरला मर्द गडी,
भाषेत गोडी घेतली रंपाट उडी बघ कशी भुरर...
तांबडा पांढरा व्हढला हाय
रांगडा मी भिडलो हाय
घाटी मी मराठी म्हणून लेका मी तर रंपाट हाय
कालचा मी आज नाय
स्वप्नं जगतोय सत्त्यात काय
मागून बोलणारे हे आज बोलतायत
अगं आय आय…
प्रवाहाच्या विरोधात भावा पव्हलोय मी
आणली ती स्थिती आधी माझी कधी नव्हती
येऊदेत कितीपण अडचणी माझ्या म्होरं हसून मी बोलेन त्यांना काय चालतंय की